‘अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री….’, देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं विधान, ‘काही लोक तुम्हाला…’


सरकार कुणाचंही असो मुख्यमंत्री कोणीही असो, उपमुख्यमंत्री अजित पवारच असणार अशी परिस्थिती महाराष्ट्रानं पाहिली. सोशल मीडियावर पर्मनंट उपमुख्यमंत्री असा उल्लेखही अजित पवारांचा होत राहिला. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या शुभेच्छा

पर्मनंट उपमुख्यमंत्रिपदाचा कधी मिटणार शिक्का?

विरोधकांकडून अजितदादांची फिरकी

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो उपमुख्यमंत्री मात्र अजित पवार असणारच अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता अजित पवारच उपमुख्यमंत्री राहिलेत. अजित पवार हे पर्मनंट उपमुख्यमंत्री असल्याचं चेष्टेनं बोललं जाऊ लागलंय. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार हे येत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा शुभेच्छा दिल्या. काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणातात. पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हा

2010मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले
2012मध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2019मध्ये तिस-यांदा फडणवीस सरकारमध्ये अडीच दिवसांसाठी उपमुख्यमंत्री
30 नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2023 मध्ये एकनाथ शिंदे सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2024 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

सहावेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार महाराष्ट्रातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदी कधी विराजमान होणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाला शुभेच्छा असल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.

विद्यमान मुख्यमंत्र्यांनं दुसऱ्या नेत्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देणं ही मोठी गोष्ट मानली जाते. पण राजकारणात जे बोललं जातं ते होतंच असं नाही. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलल्यानं अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असं त्यांच्या समर्थकांना वाटू लागलंय. फडणवीसांच्या या शुभेच्छांमुळं एकनाथ शिंदेंना काय वाटलं असावं याची चर्चा विधिमंडळ परिसरात रंगली आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24