महावितरणच्या अभय योजना: राज्यातील 65,445 ग्राहकांकडून 86 कोटी रुपये वसुल – Amravati News



थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अभय योजनेमुळे राज्यभरात ६५ हजार ४४५ ग्राहकांकडून ८६ कोटी रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या काही वर्षांतील वसुलीच्या तुलन

.

या योजनेंतर्गत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या मागणीनुसारच ही मुदतवाढ देण्यात आल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. १ सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या थकीत बिलामुळे काही ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला होता. दरम्यान या योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याने या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार वर्षअखेरपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर परिमंडळातील ७,५९२ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर परिमंडळ (६१०१ ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (५८९३ ग्राहक) दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. विभागांमध्ये नागपूर विभाग २०,४०० लाभार्थी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्या नंतर कोकण विभाग (१७,७९८), पुणे विभाग (१७,४४८) व छत्रपती संभाजीनगर (९८१८) यांचा क्रम लागतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या आहेत अतिरिक्त सवलती

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रेंचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24