औंढा नागनाथ तालुक्यातील एका तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे घरकुलाचा पहिला हप्ता टाकण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पंचायत समितीच्या घरकुल विभागातील संगणक ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १९ दुपारी पंचायत समितीच्या आवा
.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील एका तक्रारदाराच्या वडिलांच्या नांवे शबरी आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. सदर घरकुलाचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात टाकण्यासाठी पंचायत समितीच्या घरकुल विभागातील संगणक ऑपरेटर अजय पहारे याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणात हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून ता.११ डिसेंबर रोजी पडताळणी देखील करण्यात आली. त्यानंतर सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, जमादार तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, शेख अकबर, शिवाजी वाघ यांच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता.
दरम्यान, दुपारच्या सुमारास ऑपरेटर पहारे याने २ हजार रुपयांची लाच स्विकारताच पथकाने त्यास रंगेहात पकडले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणाची माहिती काळताच कार्यालयातील अधिकाऱ्यांसह लिपीकांना कार्यालयातून काढता पाय घेतला.