वाल्मीक कराड या मास्टर माईंडला अटक करा: एसआयटीतून येणार अहवालापेक्षा विद्यमान न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी- संदीप क्षीरसागर – Nagpur News



संदीप क्षीरसागर यांनी गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. या प्रकरणात राजकारण आणायचे नाही असे सांगितले. बीड मतदारसंघात कनेक्टीव्हीटी वाढली. रस्ते वाढले. सट्टा, क्लब, मटका, दारूची अवैध ठिकाणे या सर्वाची भरमार जिल्ह्यात झाली

.

येथे मराठा व वंजारा समाज जास्त आहे. या विषयात प्रामाणिकपणे लक्ष न घातल्यास गंभीर परिणाम होवू शकताे. अधिकाऱ्याकडे आडनाव पाहून पाहिल्या जाते. जातीपातीचे राजकारण करतात. माझ्या जातीचे सुईच्या टोका एवढेही नाही. तरीही दुसऱ्यांदा जिंकून आलो. 6, 9, 11 या तारखेला घटना घडाली. पवनचक्कीजवळ भांडणे झाली. ९ तारखेला संतोष देशमुखची हत्या झाली. त्याला उचलून घेऊन गेल्यावरही पोलिसांनी कारवाई केली नाही. वाल्मीक कराडचे मोबाईल रेकॉर्ड बघितले तर, पूर्ण गणित लक्षात येईल.

या प्रकरणातही पूर्ण निर्णय झाला पाहिजे. या दोन माणसांमुळे जातीपातीत व दोन समाजात तेढ निर्माण झाली. खोटे गुन्हे दाखल कारणे बंद व्हावे. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करा. वाल्मीक कराड या मास्टरमाईंडला 302 मध्ये अधिवेशन संपण्यापूर्वी अटक व्हावी. फास्ट ट्रॅकवर केस चालावी. वाल्मीक कराडला अटक न झाल्यास जिल्ह्यात लोक रस्त्यांवर उतरतील. बीडप्रमाणे परभणीतील प्रकरणीही चौकशी करावी असे क्षीरसागर यांनी सांगितले.

विजयसिंह पंडीत यांनी बीड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे व लवकरच शासन व्हावे. परभणीतील घटनेतील मृत्यूचीही चौकशी व्हावी. त्याच्या कुटुंबीयांनाही मदत व्हावी आदी मागण्या केल्या. सुनील प्रभू यांनी या राज्यात कायद्याचा धाक राहिला की नाही, असे वाटते. संतोष देशमुख या सरपंचाला अत्यंत क्रूरपणे मारल्या गेले आहे. परभणीतही पोलीस कोठडीतील विधी अभ्यासाच्या तरूणाचा मृत्यू चूकीचा आहे. राज्यात गुन्हेगार मोकाट सुटल्याचा आरोप प्रभू यांनी केला. कायद्यासाठी कडक पावले उचलावी लागेल.

एसआयटीतून येणार अहवालापेक्षा विद्यमान न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी. खऱ्या गुन्हेगारांना अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही. अल्पकालीन चर्चा लागल्यानंतर 4 जणांना अटक करण्यात आली. सामाजिक सलोखा जपण्याचे काम सरकारकडून व्हावे. अमित देशमुख, राजेश विटेकर, राजू नवघरे, सिध्दार्थ खरात यांनीही चर्चेत सहभाग घेतला. सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, नमीता मुंदडा यांनी गंभीर विषय वस्तुस्थितीप्रमाणे मांडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24