महाराणी ताराबाई कन्या विद्यालयामध्ये गणित, विज्ञान, कला प्रदर्शनाचे उद्घाटन – Ahmednagar News



केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गणित, विज्ञान, चित्रकला, हस्तकला व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

.

या प्रदर्शनाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या वासंती धुमाळ, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष संजयकुमार निक्रड, बबन साळवे, राजेश सोनवणे, जालिंदर सातपुते, सखाराम गारुडकर, नामदेव वायळ, मनीष थोरात, वनिता जाधव, राजेश्री वायभासे आदी उपस्थित होते.

आकाश दरेकर म्हणले, आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटा शिक्षक व आई-वडिलांचा असतो. चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीना पुढे जाण्याची संधी आहे. पुढे जाण्याची व ध्येय गाठण्याची वृत्ती ठेवावी. शाळेत होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. हारणे जिंकणे चालू राहते, पण स्पर्धेत उतरणे महत्त्वाचे असते. अलीकडच्या काळात पोलिस, आर्मी, एअरफोर्स याठिकाणी सुध्दा मुली काम उत्तमपणे कामगिरी बजावत आहे. मुली मुलांपेक्षा कमी नसून, आपले कर्तृत्व सिध्द करण्याचे मुलींना आवाहन केले.

प्राचार्या वासंती धुमाळ म्हणल्या, कुठलाही शोध लागत असेल, तर तो गरजे पोटी लागत असतो. एआयमुळे जगात झपाट्याने बदल होणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी संशोधकवृत्तीने प्रकल्प बनविण्याचे त्यांनी सांगितले. तर मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

या प्रदर्शनात २८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थिनींना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कला प्रदर्शनात पेन्सिल स्केच, विविध चित्रांचे विद्यार्थिनीनी रेखाटन केले होते. कागदापासून मासा, अक्रोडा पासून कासव, फोटो फ्रेम, वॉल हैंगिंग, पणती डेकोरेशन, आकाश कंदील यांसारख्या विविध हस्तकलेचे वस्तू विद्यार्थ्यांनी सुबकरीत्या तयार केल्या होत्या. गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थिनीनी बेरीज, वजाबाकी, आधीचा नंबर नंतरचा नंबर, भारतीय चलन, वाहतूक नियंत्रण, पौष्टिक अन्न, वाहतूक, विविध प्रकारच्या घरांची प्रतिकृती, पाण्याची बचत आदींचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24