शेतकऱ्यांचे पांढरे सोने आणि वर्षाला नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कापशीकडे पाहिले जाते. घाटनांद्र्यासह परिसरात या वर्षी ९०% शेतकऱ्यांनी कपाशी या पिकाची लागवड केली आहे. सध्या दोन-तीन वेचणीतच कापूस आटोपला आहे. कापसाला चांगला वाढीव भाव मिळेल, याच आ
.
मात्र निवडणूक होऊन सरकारही स्थापन झाले. तरीही अद्याप कापसाला काही वाढीव दर मिळालेला नाही. परंतु अनेक दिवस उलटूनही कापूस घरात साठवून ठेवल्याने यात घट होऊन अनेक शेतकऱ्यांचा कापूस सडू लागला आहे. यामुळे अजूनच घट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. कापसाला अजूनही म्हणावा तसा अपेक्षित भाव मिळत नसल्याने दोन महिन्यांपासून घरात झाकून साठवून ठेवलेला कापूस आतासुद्धा व्यापाऱ्यांना सहा हजार रुपये याच कवडीमोल भावात विकावा लागत आहे, उन्हाचा पारा वाढला की साठवून ठेवलेल्या कापसात अजूनच घट होते. सध्या कापसाची क्विंटलमागे जवळपास नऊ किलोची घट होत आहे यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आर्थिक स्वरुपात अडचणीत सापडला आहे. कपाशीच्या लागवडीमधून मोठ्या उत्पन्नाची आशा होती. मात्र, त्या मानाने उत्पन्नाला फटका बसला. तसेच परतीच्या पावसामुळे कपाशीच्या वाती झाल्या आहेत. यामुळेच व्यापाऱ्यांकडून कमी भावात कापुस खरेदी केली जात आहे.
परतीच्या पावसाने कापसाच्या वाती परिणामी अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या सोयाबीन पिकाचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मक्याचेही मोठे नुकसान झाले, तर थोड्याफार प्रमाणात उत्पादन निघालेल्या कपाशीलाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. डिसेंबर महिना अर्धा आला तरीही अद्यापपर्यंत कापसाचे भाव ६ हजार रुपयांच्या आसपास आहेत. अजूनही जवळपास ७० % शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनचा कापूस घरातच पडून आहे. काहीजण आता भाव वाढणार नाहीत म्हणून जो भाव मिळेल त्या भावातच कापूस व्यापाऱ्यांना विक्री करत आहे. यामुळे कपाशी लागवडीवर केलेला खर्चदेखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दहा हजारांचा भाव मिळावा : रघुनाथ मोरे या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतात लावलेला खर्चही निघण्याच्या तयारीत नसल्याने मुलाबाळांचे शिक्षण, जीवनावश्यक खर्च, विवाह, कसे भागवायचे, असा प्रश्न पडला आहे. कपाशीला किमान दहा हजार रुपये तरी भाव मिळावा, अशा शब्दांत शेतकरी रघुनाथ मोरे यांनी मागणी केली.
साठवणीमुळे घट होण्याचा धोका घाटनांद्र्यासह परिसरात या वर्षी ९०% शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापसाला चांगला वाढीव दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या वेचणीपासूनचा कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र दोन महिने उलटून गेले तरी कापसाच्या भावात वाढ न झाल्याने साठवलेल्या कापसातच आता घट होत आहे. कपाशीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी उधार-उसनवार करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी केली आहे. असे असताना ऐन पीक परिस्थिती जोमात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.