नरेंद्र मोदींना तात्काळ सत्ता सोडावी: आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आक्रमक; भाजपचा बुरखा फाटल्याचा दावा – Mumbai News



भारतीय जनता पक्षाचे नेते कायम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करतात. तो अपमान आता सहनशीलतेच्या पुढे गेला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उर्मटपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला आहे

.

या आधी देखील भाजपने शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून शिवरायांचा अपमान केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील फुलेंचा अपमान केला होता. मात्र, भाजपने त्यांना माफी मागायला लावली नाही, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता मला रामदास आठवले काय भूमिका घेतात? हे पाहायचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्या मधून जे नेते गेले, अजित पवार गेले आहेत, त्यांना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. या माध्यमातून भाजपचा बुरखा फाटला असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि संघाने देखील याचा खुलासा करायला हवा. हे त्यांनीच अमित शहा यांच्याकडून बोलवून घेतलेय का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्ष अमित शहा यांच्यावर काही कारवाई करणार आहे का? असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला. आता तरी महाराष्ट्र आणि देशाने शहाणे झाले पाहिजे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. त्यांच्याविषयी अमित शहा असे कसे बोलू शकतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता भाजप, अमित शहा आणि मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आता सत्ता सोडावी, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

जनतेला आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का?

या संदर्भात आम्ही आंदोलन करणाच आहोत. मात्र, इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. आपल्याला पाशवी बहुमत मिळाले असल्याने महाराष्ट्राला कसेही वाकवता येते, अशा मस्तीमध्ये भाजप नेते वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अशा नेत्यांवर भारतीय जनता पक्ष काय कारवाई करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारायला हवा, असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. आंबेडकर हे कोणत्या एका पक्षांचे नव्हते, तर ते सर्वांचे होते. माझे आजोबा आणि त्यांचे चांगले संबंध होते, असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

रामदास आठवले राजीनामा देणार का?

अमित शहा हे एवढे मोठे धाडस करणार नाही. त्यांना संघाने हे बोलण्यास सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. घटनाकारांचा अपमान करणाऱ्यांना भाजप संरक्षण देत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेहरू नेहरू करता करता आता भाजप आंबेडकरांवर देखील आले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता रामदास आठवले राजीनामा देणार का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजप आंबेडकरांचे नाव पुसायचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी- मोदी करून शहा यांना स्वर्ग मिळेल का? असा प्रतिप्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

pagcor employees portal