परभणी हिंसाचारवरून मला असे दिसते आहे की, धर्म आणि द्वेष पेरण्यात आला आहे त्यामुळे काहीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉम्बिंग ऑपरेशन बाहेरून आल्याचे वाटत असून घरात शिरून लाठीमार करण्यात आला आहे. त्यामुळे जो उद्रेक आहे, त्यातून नवीन गोध्र
.
शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. सरकारने सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला एक कोटी रुपये मदत द्यावी आणि त्याचा कुटुंबातील व्यक्तीस सरकारी नोकरीत घ्यावे. जे पोलीस लाठीमार मध्ये जखमी झाले त्यांना २५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आंबेडकर म्हणाले, परभणी मधील घटना दुर्देवी आहे. बांगलादेश मधील हिंदुंवर अत्याचार मोर्चा शांततेत पार पडला. पवार नावाच्या व्यक्तीस माथेफिरू जाणीवपूर्वक घोषित केले. त्याचाच गावातील एका माणसाने आम्हाला सांगितले की, त्याचे कुटुंब आणि तो व्यवस्थित आहे. त्यामुळे ज्या डॉक्टर यांनी त्याला माथेफिरू सांगितले त्याची चौकशी करावी.
परभणी मध्ये आंदोलन शांततेत पार पडले. अचानक कोणी पाठीमागून येऊन दगडफेक केली आणि परिस्थिती बेकाबु झाली. पोलिसांनी चार तासात कॉम्बिंग ऑपरेशन केले. जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये जो पोलीस नाही तो सुध्दा लाठीमार करतो आणि गाड्या फोडत आहे. त्यामुळे गृह खात्याचे पोलिसांवर नियंत्रण नाही दिसत.
सोमनाथ सूर्यवंशी हा एका जागी बसला असताना त्याला पोलीस घेऊन जाऊन अमानुष मारहाण करून जीवे मारण्यात आले. त्याचे शविच्छेदन परभणीत नाही तर संभाजीनगर मध्ये झाले पाहिजे अशी मागणी आम्ही केली. त्यानुसार अहवालात त्याला अंतर्गत आणि बाह्य जखमा होऊन तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. सरकारला ही परिस्थिती काबूत आणण्याची होती त्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाही. त्यामुळे नंतरचा हिंसाचार झालेला आहे.