पुणे शहरात मागील काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांकडून चोरून नेण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. आळंदी रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या गाडीस धक्का देऊन ती रस्त्यावर पाडून सहप्रवासी महिलेकडील चार लाखांचे दागिने अस
.
याप्रकरणी एका महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात राहण्यास आहेत. महिलेच्या नात्यातील एकाचा विवाह कार्यक्रम दिघी भागात होता. विवाह कार्यक्रम करुन महिला आणि पती दुचाकीवरुन घरी जात होते. विवाहात परिधान केलेले चार लाख दहा हजारांचे दागिने महिलेने तिच्या जवळील बॅगेत व्यवस्थित ठेवलेले होते. आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रात्री पावणेदहा वाजण्च्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी तक्रारदार महिलेकडील दागिने असलेली बॅग जबरदस्तीने पळवून नेली, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली.
चोरट्यांनी तक्रारदार यांना धक्का दिल्याने त्यंची दुचाकी रस्त्यावर घसरुन पती व पत्नी पडून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून माग काढत असून, पोलिसांनी आळंदी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पुढील तपास करत आहेत.
८८ हजारांचे दागिने चोरीस
लक्ष्मी रस्ता येथे कॅरीबँग विकण्याकरिता सुलभा रविंद्र कासार (वय-६९,रा. शुक्रवार पेठ,पुणे) थांबलेल्या असताना, दोन अनोळखी व्यक्ती त्यांना येऊन भेटले. ५०० रुपयांचे बंडल कासार यांचे पिशवीत ठेवल्याचे सांगून त्यांचे अंगावरील ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रुमालात बाठधून पिशवीत ठेवले असल्याचे भासवून ते चोरी करुन चोरटे पसार झाले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगल्यातून साडेनऊ लाखांचे दागिने चोरीला
हडपसर भागात मांजरी येथील एका बंगल्याची खिडकी उचकटून अनोळखी चोरट्यांनी घरातील बेडरुम मधील कपाटात ठेवलेले साडेनऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रदीप कृष्णा शेवकर (वय- ४७, रा. मातोश्री पार्क, मांजरी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अज्ञात चोरट्यांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप शेवकर यांचा मांजरीतील मातोश्री पार्क परिसरात बंगला आहे. शेवकर यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. घर बंद करुन कामानिमित्ताने शेवकर यांची पत्नी संध्याराणी शेवकर, आई रेखा शेवकर आणि मुलगी सानिया शेवकर नातेवाईकांकडे गेले होते. त्यांचा मुलगा हडपसर भागात साधना शाळेत आहे. मुलाला सकाळी शाळेत सोडून शेवकर हे त्यांच्या भाजीपाला विक्री दुकानात गेले.
रात्री शेवकर यांची मुलगी सानिया आणि भाची हर्षदा घरी आली. त्यावेळी घराच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटले असल्याचे त्यांना दिसून आले. अनोळखी चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला. बेडरुम मधील सामान अस्थाव्यस्त करुन कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे गंठण, सोनसाखळी असा साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच ,हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचारी एस कांबळे पुढील तपास करत आहेत.
घरफोडीत सहा लाखांचे दागिने लंपास
सिंहगड रस्ता येथील विश्वास पॅराडाईज या इमारतीत फ्लॅट मध्ये राहत असलेल्या मृदुला तानाजी कदम (वय-२८) यांचे रहाते घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर मध्ये लॉक करुन सोन्याचे दागिने ठेवलेले होते. अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटाच्या आतील बाजूस असणाऱ्या कप्यात ठेवलेल्या चावीच्या सहाय्याने पाच लाख ९९ हजार ६४० रुपये किंमतीचे मौल्यवान सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.