पुणे शहरात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. वारजे परिसरात एका मंडप साहित्याच्या गोदमास भीषण आग लागली. संबंधित गोदामातील आग पाण्याचा फवारा मारुन आटोक्यात आणत असताना अग्निशमन दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कात्रज भागातील एका प्ल
.
मुंबई – बंगळुर महामार्गा जवळ पुण्यातील वारजे भागात दांगट पाटीलनगर परिसरातील एका मंडप साहित्याच्या गोदामास बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गाेदामातील मंडप साहित्याने पेट घेतल्याने आगीने राैद्ररुप धारण केले.अग्नीशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन काही वेळातच सदर आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणताना वारजे अग्निशणन केंद्रातील जवान अक्षय गायकवाड यांच्या खांद्यास किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर, कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात देखील एका प्लायवुडच्या गोदामास आग लागल्याची माहिती बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रास मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली.संबंधित आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
कोंढवा परिसर मध्ये भागोदयनगर याठिकाणी एका इमारतीत मंगळवारी दुपारी आग लागलेली होती.त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल हाेत, इमारतीत अडकलेल्या तीन वर्षाच्या मुलासह पाच महिलांची सुखरुप सुटका केली होती.