विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांची प्रतोदपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बाळ
.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे त्यामुळे विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार? असा प्रश्न काँग्रेसच्या गोटात चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र काँग्रेसमधील संभाव्य फेरबदलात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांची प्रतोदपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर विश्वजीज कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरू आहे.
नाना पटोलेंचा गटनेतेपदासाठी आग्रह
दुसरीकडे, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली असली तरी त्यांनी आता विधिमंडळातील गटनेतेपदासाठी आग्रह धरला आहे. पण त्याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच तसे संकेत दिलेत. नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेता करण्याची चर्चा मी ऐकली नाही. यासंबंधीचा कोणताही निर्णय हायकमांड घेईल. 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा होील. त्यामुळे हा निर्णय नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांचा स्वतःचा नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते.
विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
दरम्यान, विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेस यासंबंधी आज एका बैठकीनंतर निर्णय घेईल असा अंदाज आहे. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार किंवा नाही हे स्पष्ट होईल.
हे ही वाचा… महाराष्ट्रात 24 तासांत खातेवाटप?:भाजपला गृह, राष्ट्रवादीला अर्थ तर शिवसेनेला शहर विकास अन् सार्वजनिक बांधकाम मिळण्याची शक्यता
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारचे खातेवाटप पुढील 24 तासांत होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य खातेवाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीनंतरही राज्याचे गृह खाते भाजपकडेच राहणार असून, शिवसेनेला शहरविकास व सार्वजनिक बांधकाम विकास मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना त्यांचे अर्थमंत्रालय मिळण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर