आम्हाला स्वर्ग बघायचा नाही. स्वर्ग आणि देव काय असतो हे आम्हाला माहिती नव्हते. मानवाचे जीवन काय असते हे आम्हाला माहिती नव्हते ते आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवले. असे म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदा
.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर असे म्हणणे ही फॅशन नाही तर आमच्या आंतरआत्माचा आवाज आहे. ही जर कुणाला फॅशन वाटत असेल तर त्याला आम्हाला मागे न्यायचे आहे, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संविधान आले नसते तर मनुस्मृती आली असती. स्त्रीयांना स्त्री म्हणून जगता आले नसते, असे त्यांनी म्हटले आहे. आज 85 टक्के लोकांनी आपल्या देवघरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायला हवा, असेही यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे.
नेमके जितेंद्र आव्हाडांचे ट्विट काय?
जितेंद्र आव्हांड यांनी ट्विट करत म्हटलंय की, आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही. पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे त्यांचे नाव फैशन म्हणून घेतले जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते .देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला .तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, आज मागासवर्गीय समाजातील लोकांना पंतप्रधान होता आलं, आदिवासी समाजातील व्यक्तींना राष्ट्रपती होता आलं, माझ्या सारख्या भारतातील तमाम SC, ST, OBC, समाजातील लोकांना मंत्री, खासदार, आमदार होता आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या भारतातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल झाले. माणसाला माणूस म्हणून जगता आलं. त्यांच्या संविधानामुळेच या भारताची अखंडता टिकून राहिली, त्यांच्या संविधानामुळेच या देशाला समता-न्याय-बंधुत्वांची शिकवण मिळाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला “देवापेक्षा” कमी नाहीत..! जय भिम..! -डॉ. जितेंद्र आव्हाड..!
सरकारचा डोक्यात सत्तेचा माज
काँग्रेसेच आमदार भाई जगताप म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. तसेच ईव्हीएम देवीच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये करण्यात येत आहे. हा माज लोकशाहीला मारक आहे. हा खरा संघ आणि भाजपचा चेहरा आहे
अमित शहा यांचे वक्तव्य काय?
सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे. एवढे देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केले.