पंपवार बाईकमध्ये सीएनजी भरताना एकाला आपला डोळा गमवावा लागला. पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस.स्वेअर सीएनजी पंपवार ही धक्कादायक घटना घडली. सीएनजी नोझल उडून कामगाराच्या डोळ्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. हर्षद गणेश गेहलोत असे जखमी कर्मचाऱ्याचे ना
.
संबंधित घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद एस स्वेअर पंपावर कामाला असून दुचाकी आणि गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याचे काम करतो. रविवारी सायंकाळी तो एका बाईकमध्ये सीएनजी भरत होता. त्याने पाईप बाईकवर ठेवला आणि पंपाचे बटन सुरू करण्यासाठी गेला. तेवढ्यात गॅसचे नोझल वेगाने उडाले आणि ते हर्षदच्या डोळ्याला लागले. नोझल डोळ्याला लागल्याने हर्षद खाली कोसळला. घटना घडताच आसपासचे लोक घाबरले आणि सैरावेरा पळू लागले.
घटना घडताच आसपासच्या लोकांनी हर्षदला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून त्याच्या डोळ्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पंप मालक रोहित हरकुर्ली आणि धैर्यशील पानसरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहकार नगर पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
अशी घ्या सीएनजी वाहनांची काळजी दरम्यान, यापूर्वीही सीएनजी वाहनांनी आग घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. देशात सीएनजी कारला मोठी मागणी आहे. काही लोक जुन्या गाड्यांमध्ये सीएनजी किटही बसवतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनाची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
- सीएनजी कारला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे उच्च दाबाने त्याची साठवण. कोणत्याही कारणाने इंधनाची गळती झाल्यास ते आगीचे कारण बनू शकते.
- सीएनजी कारच्या इंधन लाइन किंवा टाकीची नेहमी काळजी घ्या. वास्तविक, त्यांच्याकडून गॅस गळती होण्याची शक्यता असते. त्यामुळे कारला आग लागू शकते.
- तुमच्या सीएनजी कारमध्ये हे किट बसवण्याचे काम नीट झाले नसेल किंवा काही तांत्रिक बिघाड असेल. कारला आग लागण्याचे हे देखील कारण असू शकते.
- सीएनजी कार नेहमी मेंटेन ठेवा. कारच्या देखभालीच्या अभावामुळे, इंधन प्रणाली खराब होऊ शकते. त्यामुळे कारला आग लागू शकते.