अवघे ५८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारच्यावर गीते, गीतरामायण सारखे महाकाव्य, कथा, पटकथा, संवाद लेखन असे प्रचंड काम केले. त्यांची कामावरील निष्ठा आणि कष्ट यांचा अवमान न करता सृजनशील क्षेत्रातील त्यांचे अफाट काम पाहून, जणू
.
गदिमा प्रतिष्ठानतर्फे आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या गदिमा स्मृती समारोहात ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भणगे बोलत होते.
टिळक स्मारक मंदिरत आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पुरस्कारार्थींसह गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर उपस्थित होते.२१ हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे. अकरा हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर पाच हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे चैत्रबन आणि विद्या प्रज्ञा पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी गदिमांचे निकटवर्ती स्नेही आणि महाराष्ट्राचे नामवंत भाषा आणि शिक्षणतज्ञ ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे म्हणाले की, गदिमांचे काव्य हे चित्रदर्शी होते. त्या काव्यावर आजही कोणी चित्रपट केल्यास त्याला मानाचा पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या की, एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद गगनात मावत नाही, असे म्हटले जाते. पण पुरस्कार मिळाल्यनंतरचा आनंद मावण्यासाठी गगनाची का आवश्यकता असते, याचा अनुभव मला आज येतो आहे.