शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर चांगलेच: महायुतीची ताकद वाढून देशाच्या विकासात भर पडेल, रामदास आठवले यांचे विधान – Parbhani News



राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी अशा भावना व्यक्त झाल्या. यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता अजि

.

परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमान प्रकरणानंतर निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले परभणीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्यासह विविध विषयांवर भाष्य केले.

शरद पवार, अजित पवार एकत्र आलेले चांगले मी वेळोवेळी जेष्ठ नेते शरद पवार यांना आग्रह करीत आलेलो आहे की आपण नरेंद्र मोदी सोबत महायुतीमध्ये सहभागी व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा. आता अजित पवार तर आमच्या सोबतच आहेत पण आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले तर महायुतीची ताकद वाढेल आणि देशाच्या विकासात भर पडेल. हे दोघे एकत्र आलेले चांगले राहील, असे रामदास आठवले म्हणाले.

परभणीत कोंबिंग ऑपरेशनची गरज नव्हती परभणीतील घटनेवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, आंबेडकरी जनता संविधानावर प्रचंड प्रेम करते. संविधानाचा अपमान झाल्यानंतर ती रस्त्यावर उतरून निषेध करणारच. या निषेध दरम्यान पोलिसांनी जो लाठी चार्ज केला त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आठवले यांनी केली. कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज नव्हती ते मी थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते, असेही ते म्हणाले. तसेच निरपराध नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

एक मंत्रिपद, एक विधान परिषद द्यावे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मंत्रिपद आणि एक विधान परिषद द्यावे, अशी मागणी केली आहे. लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नाही. विधानसभेला दोन जागा मिळाल्या, पण उमेदवार भाजपचाच राहिला. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळावे. सोबतच एक विधान परिषदेची जागा मिळावी, असे आठवले म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24