राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. रविवारी नागपूरमध्ये मंत
.
नरहरी झिरवाळ यांनी 2019- 2024 या काळात विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. यापूर्वी त्यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिले नाव नरहरी झिरवाळ यांचे पुढे येत आहे.
अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी फायनल करत मुख्यमंत्री फडणवीसांना सोपवली होती. त्यानंतर आज सायंकाळी सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदासाठी फोन केला. त्यांनी कुटुंबासमवेत शपथविधीसाठी हजर राहण्याचा निरोप देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. झिरवाळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार, हे पहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीत जुन्या 5 मंत्र्यांची नावे चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळून 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील या विद्यमान मंत्र्यांची नावे कायम राहतील. दिलीप वळसे पाटील यांनी आधीच नकार कळवला आहे, तर हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो. दत्ता भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची दुसरी वेळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी, उपराजधानीतील राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. एक हजार पाहुण्यांची आसन व्यवस्था केली जात आहे. राजभवनातील हिरवळीवर शपथविधी होणार आहे. 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता नागपूरमध्ये राजभवनावर हा सोहोळा होत आहे. राज्याच्या राजकीय ईतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 1991 रोजी छगन भुजबळ यांच्यासह डॉ. राजेंद्र गोडे, जयदत्त क्षीरसागर, वसुधा देशमुख, भरत बाहेकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती.