शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटका समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी कोटगिरे यांची अवघ्या 4 तासांतच सुटका केली. पण सोबतच त्यांना रिअल्टीचे धंदे बंद करण्याची तसेच राजकीय नेत्यांवर
.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव कोटगिरे हे शुक्रवारी सायंकाळी शहरातील बाफना टी पॉइंट भागात गेले होते. तिथे काही जणांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांना जबरदस्तीने एका गाडीत बसण्यास भाग पाडले. त्यानंतर ती गाडी वेगाने नरसी – नायगाव रोडवरील चंदासिंग कॉर्नर भागाकडे गेली. कोटगिरे यांच्या वाहन चालकाने या घटनेची माहिती त्यांच्या नातलगांना दिली. त्यानंतर त्यांनी ती पोलिसांना कळवली. ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. अखेर या घटनेची मिळताच पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवली. त्यानंतर काही तासांनी अपरहरणकर्त्यांनी कोटगिरे यांची सुटका केली.
राजकारण्यांवर न बोलण्याची धमकी
या प्रकरणी गौरव कोटगिरे यांच्या तक्रारीनुसार इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक सुशील नाईक यांनी दिली. यासंबंधीच्या तक्रारीनुसार, अपहरणकर्त्यांनी कोटगिरे यांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे धंदे बंद करण्याची व राजकीय लोकांवर भाष्य केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जमीन खरेदी-विक्रीचे धंदे बंद करा. आज तुला केवळ उचलले आहे. यापुढे राजकीय नेत्यांविषयी बोलले तर याद राख, तुला ठार मारू, असे ते म्हणालेत.
देशमुख हत्याकांडानंतर घडली घटना
उल्लेखनीय बाब म्हणजे बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अवघ्या आठवडाभरातच ठाकरे गटाच्या नांदेड शहरप्रमुखाचे अपहरण झाल्यामु्ळे अवघा मराठवाडा हादरला आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. तसेच या घटनेची राजकीय अंगानेही चौकशी करत आहेत. दरम्यान, गौरव कोटगिरे हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली होती.
हे ही वाचा…
‘करणी’च्या नावाखाली 84 लाखांची लबाडी:अजित पवार यांची गाडी चालवून कौतुकाची थाप मिळवलेल्या महिला पोलिसाला बेड्या
कोल्हापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य केलेल्या एका महिला पोलिसाला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर करणीच्या नावाखाली भोंदूबाबाच्या मदतीने सुमारे 84 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तृप्ती संजय मुळीक असे आरोपी महिलेचे नाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार 2021 मध्ये सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तृप्तीने त्यांच्या गाडीचे सारख्य केले होते. एका महिलेने उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. पण आता तिला पैशांच्या लबाडीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तृप्तीवर करणीच्या नावाखाली भोंदूबाबा दादा पाटील महाराज याच्या मदतीने कोल्हापूरच्या गंगावेश येथील सुभाष कुलकर्णी यांच्या घरातील दागिने, रोख रक्कम, साहित्य असे एकू 84 लाख लुबाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. वाचा सविस्तर