दादर रेल्वे स्थानकावरील 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर तुटणार नाही किंवा तोडले जाणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या संदर्भात कालच रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला आहे. आज त्यांचे अधिकृत स्पष्टिकरण देखील येणार असल्य
.
दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या हनुमान मंदिरावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. त्यानंतर भाजपने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. आता आमदार आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.
आता हनुमानाच्या शरणी जावे लागले
‘हनुमान चालीसा वाचणाऱ्या भक्तांना जेलमध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता हनुमानाच्या शरणी जावं लागत आहे. त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी, उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ, वोट जिहादचे शरण स्वीकारले आहे. त्यांनी तिथेच राहावे.’ अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती
दादर येथील 80 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हमालांनी मंदिर बांधले होते. तेव्हापासून कोणतेही अडचणी आला नाही. हा मजुरांचा देव आहे. हा संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता तिथे महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे आणि मी आणि स्थानिक आमदार महेश सावंत तसेच हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी महाआरती करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर हिंदू म्हणून तर त्यांनी देखील आरतीला यावे. त्यांच्या हातात आम्ही गदा आणि घंटा देऊ. मात्र त्यांना हिंदुत्व कळत नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.