थंडीचे प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी थंडीमध्ये शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते याच पार्श्वभूमीवर सुकामेवा घेण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुका मेव्याच्या दरात प्रति किलो १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. थं
.


नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढते. या दिवसांमध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक, खोबरे या सुकामेवा पदार्थांना मोठी मागणी असते. या पदार्थांबरोबरच शुध्द देशी तुपाच्या दरात देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे थंडीसाठी बनविले जाणाऱ्या लाडूंसाठी गृहिणींना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
^थंडीच्या दिवसांत अनेक नागरिक सुकामेवा खरेदी करत असतात. यंदा गतवर्षीच्या तुलनेत १०० ते १५० रुपये किलोने सर्वच घटक पदार्थांचे दर वाढलेले आहेत. सध्या थंडीचे प्रमाण दररोज घटत चालले आहे. या पदार्थांचे दर वाढले असले तरी मागणी देखील चांगली आहे. – वरुण दगडे, व्यापारी