बायको एकटीच ‘वॉक’ला गेल्याने तीन तलाक: ठाण्यात 31 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल, सासऱ्याला फोनवरून दिली तलाकची खबर – Mumbai News



एका 31 वर्षीय व्यक्तीने पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला जात असल्यामुळे तिला तीन तलाक दिल्याची विचित्र घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी एका 31 वर्षीय व्यक्तीवर आपल्या पत्नीला कथितपणे तीन तलाक देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक देण्यावर 2019 मध्येच बंदी घातली होती. त्यानंतरही या व्यक्तीने या मार्गाचा अवलंब करत आपली संसारगाठ तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपी व्यक्ती मुंब्रा भागात राहतो. त्याने आपल्यी 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन करून आपण ट्रिपल तलाकच्या माध्यमातून घटस्फोट देत असल्याचे सांगितले. यासाठी त्याने आपली बायको एकट्यानेच मॉर्निंग वॉकला जात असल्याचे कारण दिले.

पत्नीने दिली पोलिसांत तक्रार

आरोपीने तीन तलाकसाठी दिलेले कारण ऐकून पीडित महिलेच्या वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तत्काळ आपल्या मुलीसोबत पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात बुधवारी भारतीय न्याय संहिता कलम 351 (4) गुन्हेगारी धमकी व मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

भारतात तीन तलाक घटनाबाह्य

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने 22 ऑगस्ट 2017 रोजी तीन तलाक घटनाबाह्य असल्याचे घोषित केले होते. सुप्रीम कोर्टाने 1400 वर्ष जुनी परंपरा घटनाबाह्य घोषित करत सरकारला यासंबंधी कायदा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्राने संसदेत एक कायदा पारित करून या कुप्रथेचा पायबंद केला होता. प्रस्तुत कायद्यानुसार, तीन तलाक देणे फौजदारी गुन्हा असून, त्यासाठी किमान 3 वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

हे ही वाचा…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ‘उडवण्याची’ धमकी:रशियन भाषेतील ईमेलने खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई – रशियन भाषेतील ईमेलने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ‘उडवण्याची’ धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल रशियन भाषेत असल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ला उडवण्याच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढली आहे. गुरुवारी दुपारी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ई-मेल आला आहे. ज्यामध्ये बँक उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल रशियन भाषेत पाठवण्यात आला होता, त्यामुळे हे प्रकरण अधिकच संशयास्पद आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24