शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अजित पवार सहकुटुंब दाखल झाले होते. अजित पवार हॉलमध्येच जातात सुप्रिया सुळेंचे पती आणि मुलगी हॉलमधून बाहेर गेल्याचे पहायला मिळाले. अजित पवार आल्यानंतर सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळ
.
युगेंद्र पवार म्हणाले की, रेवतीचा राग वैगेर आहे, असे काही नाही. यामध्ये तिचा काय संबंध. ती कुठेतरी किचनमध्ये नाश्ता करत होती. ती तिथेच कुठेतरी शेजारी होती. ती माझी लहान बहीण आहे. बाकी असे काही नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले.
युगेंद्र पवारांच्या प्रतिक्रियेनंतर अजित पवार आणि इतर नेते जेव्हा शरद पवारांच्या भेटीला गेले तेव्हा, सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि पती सदानंद सुळे हे हॉलबाहेर थांबले होते या चर्चांवर विराम लागला आहे.
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आप्तेष्टांसह नेत्यांची गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. संसदीय अधिवेशनामुळे शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे देखील दिल्लीत आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांसह आप्तेष्टांनी दिल्लीतील निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी अजित पवारही सहकुटुंब आले होते.
आशीर्वाद घेण्यासाठी आलो – अजित पवार अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो आहे. आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.
हे ही वाचा…
शरद पवार@85 : पराभव झाला तरी चालेल पण शरदलाच उमेदवारी द्या! यशवंतराव चव्हाणांमुळे शरद पवारांना पहिल्यांदा मिळाले होते तिकीट !

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवारांना खूप महत्त्व आहे. काँग्रेस अंतर्गतविरोध असताना शरद पवारांसाठी काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण आग्रही असल्याने त्यांना मिळाले होते तिकीट. पूर्ण बातमी वाचा….