संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: काँग्रेसची मागणी; पटोले म्हणाले – आंबेडकरी अनुयायांवरील अत्याचार थांबवा – Mumbai News



परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणाऱ्या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कस

.

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने तोडफोड केली होती. या घटनेविरोधात आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले होते. यामुळे पोलिसांनी जमावावर अंकुश मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करत जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद आदी उपाययोजना केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनही राबवले होते. त्यात आता अनेक तरुणांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळीही कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा दावा केला जात आहे.

परभणीतील घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच, पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न मानणाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. संचारबंदी लावली. इंटरनेट व एसटी सेवा बंद केली. पोलिस व प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलिस अधिक्षकांना तात्काळ निलंबत करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू, पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. नागरिकांनी या प्रकरणी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी यावेळी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24