राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींच्या प्रकरणाच्या चालू तपासाचा भाग म्हणून छापेमारी केली. एनआयएने पाच राज्यांमध्ये 19 ठिकाणी शोध घेतला.
.
जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापा मारला. यात महाराष्ट्रातील अमरावती व भिंवडीमधून एका, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होता. त्याची कसून चौकशी सुरु केली आहे.
अमरावतीमधील एक तरुण पाकिस्ताच्या संपर्कात असलेली माहिती एनआयएला मिळाली. त्यानंतर एनआयएचे पथकाने बुधावारी थेट अमरावती गाठत त्याला रात्री 12 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु केली. तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का?, याबद्दल तपास सुरू आहे.
मागील वर्षीही मोठी कारवाई
मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणावर 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.