येरवड्यातून जन्मठेप झालेला कैदी पळाला: खुनाच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा; गुन्हा दाखल, शोध सुरू – Pune News



पुणे शहरातील येरवडा परिसरात असलेल्या येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेला एक कैदी कारागृह रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या अनिल मेघदास पटोनिया (वय 35) या कैद्याविरुद्ध येरवडा

.

आराेपी अनिल पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावा मधील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा, तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली होती. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृाहत करण्यात आलेली होती. येरवडा खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था असून त्याची चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते.बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आलेली हाेती. त्यावेळी पटोनिया आढळून आला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली असून, पसार झालेल्या पटोनियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट देवून पाहणी केली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस टकले करत आहेत.

पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली.याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अशोक देवबहाद्दुर घर्ती (वय 32, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय 40, रा. श्री स्वामी समर्थ हाइट्स, आंबेगाव पठार, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक घर्ती यांचा भाऊ गोपाल (वय 33) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अशोक घर्ती बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. चंदनगर भागातील टाटा गार्डन चौकात भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार घर्ती यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घर्ती यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24