मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबरला मुंबईत होणार: अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी स्पष्टच सांगितली तारीख – Pune News


राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी थेट तारीखच सांगितली आहे. 14 तारखे

.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचले आहेत. तर अजित पवार यांच्यासह महायुतीचे काही मोठे नेते देखील दिल्लीत जाण्याची जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे टीका होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे स्व:त जय पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ बारामतीमध्ये आयेाजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी नियोजित होता. मात्र, याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, हा सत्कार नंतर कधी होणार? या बाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. 16 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. त्यानंतरच हा सत्कार होईल.

राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…

पवारांवर टीका होताना अजित पवार आक्षेप का घेत नाहीत?:युगेंद्र पवारांचा थेट सवाल; विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मैदानात

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेला राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. तसेच मतदारसंघाचा दौरा देखील ते करणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेले टिकेवरुन त्यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे. महायुतीतील भाग असून देखील शरद पवार यांच्या बद्दल असे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आक्षेप का घेत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24