‘मी पुन्हा येईन’ ऐवजी ‘तो पुन्हा आलाय…’: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, राज्यभरात कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी – Nagpur News



महाराष्ट्रात महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार आहे. 5 तारखेला देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी “तो पुन्हा आलाया”, अशा घोषणेचे बॅनर लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा ये

.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजप पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महायुतीत भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे निश्चित होतेच, मात्र तरी देखील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विश्वासात घेत सत्ता स्थापन करण्यासाठी दहा दिवस चर्चा केल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आला.

सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या तसेच राजकीय नाट्य देखील बघायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने ते गावी जाऊन बसले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, अशी धाकधूक लागलेली होती. तसेच शिंदे नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र आज महायुतीचे सर्व नेते राजभवनात हजर होते तसेच पत्रकार परिषद देखील सर्वांनी घेतली आणि यात महायुतीमध्ये सर्व काही ठीक असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जातीय समीकरणे पाहता भाजप मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा देईल अशी सुद्धा चर्चा सुरू होती. पण केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदावर निवड केली आणि या चर्चांना पूर्णविराम दिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब होताच नागपूरसह राज्यभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आणि ‘तो पुन्हा आलाय’ असे बॅनर झळकायला लागले. सोशल मीडियावर देखील याच वाक्याने देवेंद्र फडणवीस यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

भाजपचे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटके, माजी महापौर व फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी, आमदार परिणय फुके यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. शहराच्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेले हे पोस्टर्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24