साेशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या 21 वर्षीय तरुणाने एका 19 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळयात ओढले. सदर तरुणीला त्याने व्हाॅटसअपद्वारे आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिला कपडे न घातलेले नग्न फाेटाे पाठविण्यास भाग पाडून तिला लग्नाची मागणी केली. परं
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिडित तरुणी व आराेपी यांची एकमेकांशी ओळख निर्माण झाली हाेती. त्यानंतर त्यांच्यात फाेन व चॅटिंगद्वारे बाेलणे हाेत हाेते. तरुणाने तिला वेळाेवेळी लग्नाची मागणी केली परंतु तिने त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला व्हाॅटसअपवर आत्महत्या करण्याची धमकी दिली तसेच तिला तिचे कपडे न घातलेले नग्न फाेटाे पाठविण्यास बळजबरीने भाग पाडले. सदर फाेटाे आल्यावर त्याने तिला लग्नाची पुन्हा मागणी केली परंतु तरुणीने त्याच्यासाेबत लग्न करण्यास नकार दिला. त्यमाुळे तरुणाने तिचे नग्न फाेटाे व्हाॅटसअप, फेसबुक व वेगवेगळया फेक इंन्स्टाग्रामवून तिचे नातेवाईकांना व साेशल मिडियात व्हायरल करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करुन बदनामी केली आहे. याबाबत वारजे पोलिस पुढील तपास करत आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंढवा परिसात रहाणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीसाेबपत घराशेजारी रहाणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने प्रेमाचे नाटक केले. तिच्या राहते घरी काेणी नसताना त्याने तिच्या घरात चार ते पाच वेळा जाऊन तिच्यासाेबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याचे घरी देखील एकदा मुलीस घेऊन जाऊन तिच्यासाेबत शारिरिक संबंध केले. सदरचा प्रकार 14 फेब्रुवारी 2024 ते आतापर्यंत घडला आहे. याप्रकरणी पिडित मुलीने आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर 24 वर्षीय आराेपीस अटक करण्यात आली आहे.