विविध आमिषे दाखवून अज्ञात सायबर चोरट्यांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहे. अनोळखी चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची 75 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
.
कोथरुड परिसरातील एक 36 वर्षीय तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने विश्वास संपादन करून 25 लाख एक हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित तरुणाने कोथरुड पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत असल्याचां बहाणा चोरट्यांनी केली. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या विविध बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी थोडी रक्कम दिली.मात्र, पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम पुढील तपास करत आहेत.
महिलेस 42 लाखांचा गंडा
एका महिलेस घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवून अज्ञात चोरट्यांनी विश्रांतवाडी परिसरातील एका महिलेशी संपर्क साधला. तिला वेगवेगळे अमिश दाखवून तीच्यकडून ४२ लाख १२ हजार रुपय घेऊन सदर रकमेची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तक्रारादर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी मेसेज केला की,ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास अल्पावधीत चांगली रक्कम मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी बँक खात्यात पैसे मागवून घेतले. त्यानंतर महिलेला कोणताही परतावा दिला नाही. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे पुढील तपास करत आहेत.अशाच प्रकारे ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका तरुणची चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे पुढील तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक
कुरिअरद्वारे पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.