पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन तरुणीवर इमारतीच्या पार्किंगमध्ये अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरमी पीडित मुलीने आराेपी तरुणाविराेधात फरासखाना पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी व आराेपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आराेपी मुलाने पीडितेस आपला वाढदिवस असल्याची बतावणी केली होती. तिला वाढदिवसाकरिता घरी घेऊन जाताे असे सांगून त्याने तिला एका अज्ञात ठिकाणी असणाऱ्या बिल्डींगच्या पार्किंगमधील खोलित नेले. ‘आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे’ असे म्हणत त्याने तिच्याकडे शारिरिक सुखाची मागणी केली. त्यावेळी मुलीने त्यास नकार दिला. परंतु त्यानंतर तरुणाने जबरदस्तीने तिचा हात पकडून तिला बेडवर पाडून मिठी मारुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे वर्तन केले. तिचा विनयभंग केला. तसेच घडलेला प्रकार काेणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना मारेन अशी धमकी देखील त्याने दिली.
त्यानंतर मुलगी घरी गेल्यावर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर याबाबत पालकांनी मुलीसाेबत पाेलीस ठाण्यात जाऊन आराेपी विराेधात तक्रार दाखल केली. पाेलीस उपनिरीक्षक अमाेल काळे याबाबत पुढील तपास करत आहेत.
माहेराहून पैसे आणण्यासाठी महिलेचा छळ
काेंढवा परिसरात राहाणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेचा माहेराहून पैसे आणण्याच्या मुद्यावरून छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचा पती, सासू, सासरे, दीर, नणंद यांच्यावर काैटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.