विधानसभा निवडणुकीत आलेले निकाल, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक प्रक्रियेकवर प्रश्न उपस्थित करत पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी तीन दिवस आत्मक्लेश उपोषण केले होते. शनिवारी त्यांनी हे उपोषण मागे घेतले. त्यांच्या या उपोषणावर आमदार सदभाऊ खोत
.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, कॉंग्रेसने आणलेले ईव्हीइम मशीन काँग्रेसच्या काळात आढाव यांना योग्य दिसत होते का? मुस्लिम बहुल भागातील मते नाही तिच्या विरोधात गेली तिथे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली नाही असे आढाव यांना वाटत नाही का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, बाबा आढाव यांच्या बाबतीत मला प्रचंड आदर आहे. ते समाजसेवक होते. त्यांनी अनेक आंदोलने केली. अनेकांना न्याय मिळवून दिले. परंतु, काल त्यांनी जे केलेले आंदोलन होते त्या आंदोलनाला माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनात अनेक शंका निर्माण झालेले आहेत. ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या काळात आलं. त्या काळात बाबा आढाव यांना त्या काळातले मशीन योग्य वाटत होते का? हा मला पडलेले एक प्रश्न आहे, असे खोत म्हणाले.
सदभाऊ खोत म्हणाले, या निवडणुकीत जर आपण पाहिले तर मुस्लिम बहुल परिसर होता. त्या ठिकाणी मते ही महायुतीच्या विरोधामध्ये पडलेली आहेत. मग मुस्लिम बहुल समाज जिथे होता त्या ठिकाणची जी ईव्हीएम मशीन होती ही मशीन योग्य चाललेली होती का? या मशीनला तिथे गडबड करावी का वाटली नाही? म्हणजे याचा अर्थ सरळ आहे. आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे. हे आता यातून स्पष्ट झाले आहे.
एक्सवर पोस्ट शेअर करत सदभाऊ खोत म्हणाले, “बाबा आढाव साहेब सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी.मुस्लिम बहुल भागात EVM मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे ‘सेटिंग’ का होत नाही?असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत.”