भाऊ-बीजच्या माध्यमातून बांधले गेले आशा, अंगणवाडी सेविकांसोबत अनुपम बंध: वलगावात सिकची चॅरिटेबल ट्रस्टकडून आयोजन – Amravati News



गावागावांत, कुटुंबा कुटुंबामध्ये बिघडलेले सामाजिक संबंध पूर्ववत करुन नवे अनुपम बंध तयार करण्याच्यादृष्टीने वलगावात भाऊ-बीज कार्यक्रम घेण्यात आला. निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर असल्यामुळे तिथीनुसार न घेता शनिवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रकाश साबळ

.

मूळच्या भारतीय असलेल्या आस्ट्रेलिया येथील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ डॉ. पवित्राताई गडलिंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे, विविध गावच्या सरपंच अर्चना तायडे, माला मोहोरे, कांता वाहने, नूतन काळे, ज्योस्तना मोहोड, कल्पना वाकोडे, माजी जि. प. सदस्य संगीता ठाकरे, प्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर, प्रा.ज्योती यावलीकर, कविता विधळे, सविता बोबडे, माजी सरपंच वनिता लोखंडे आदी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या.

वलगावच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये कार्यरत आशा वर्कर, उमेद प्रकल्पातील महिला, अंगणवाडी सेविका, विविध महिला भजनी मंडळाच्या सदस्या आदी क्षेत्रातील सुमारे ४०० महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, गावागावांत,घरा-घरांत सध्या वेगवेगळे वातावरण तयार झाले आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये घुसलेले प्रदुषण हे त्याचे मूळ कारण आहे. त्यामुळे कौटुंबीक सौहार्द कायम राखूनच आपल्याला या समस्येवर मात करणे शक्य आहे. प्रकाश साबळे यांनी आपल्या वक्तव्यादरम्यान सामाजिक कार्य करणाऱ्या माय-माऊली, भगिनींचा सन्मान करत त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली.

सदर सोहळ्यादरम्यान माजी जि.प. सदस्या संगीता ठाकरे, कविता विधळे, प्रा.ज्योती यावलीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मंचावर विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख प्रा. दिलीप काळे, सिकची रिसोर्टचे व्यवस्थापक सचिन मालकर, सामाजिक कार्यकर्ते गजाननराव कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सर्व लाडक्या बहिणींनी सामूहिक औक्षण करून भाऊबीज साजरी केली. मान्यवरांच्या हस्ते भजनी महिला भगिनींना भजन दिंडीचा पिवळ्या रंगाच्या काठाच्या साडयाचा ड्रेसकोड प्रदान करण्यात आला तसेच आशावर्कर व इतर भगीनींना पितळच्या फुलारी भाऊबीज भेट रूपानं प्रदान करण्यात आल्या. संचालन सीमा पाखरे यांनी केले. आभार श्वेता उल्हे यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी राहुल तायडे, शशिकांत बोंडे, सुनील भगत, निलेश उभाड, अनुल्ला खान, विश्वंभर मार्के, ज्ञानेश्वर काळे ,गोपाल महल आदींनी परिश्रम घेतले.

विविध धर्मगुरुंचे आशिर्वाद

या कार्यक्रमाला रामदासजी सदार, भाई मुकेश सिंगजी, रघुनाथराव ठाकरे, भन्ते राजरतन, हाफिज अब्दुल रहीम व फादर जोस आदी विविध धर्माचे धर्मप्रमुख यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून आशीर्वाद प्रदान केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24