निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’ म्हणत भरघोस मतदान: वंचित, बसप, मनसे या छोट्या पक्षांचे मतदान 8.3 टक्क्यांवरून घटून 4.8 टक्के झाले कमी – Nagpur News



वाढलेल्या मतदानाचा टक्का बघता नोटाची जवळजवळ ४.५ लाख मते घटली आणि हिंदुत्वाच्या कामी आली. २०१९ साली १.३४% लोकांनी नोटा हा पर्याय निवडला होता. तर २०२४ मध्ये फक्त ०.७२% नोटाचा पर्याय लोकांनी निवडला. २०१९ मध्ये वंचित, बसप, मनसे अशा छोट्या पक्षांना ८.३% म

.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ७० लाख मते या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जास्त आली आणि भाजपाची मतांची संख्या सुद्धा ३० लाखांनी वाढली. याचाच सरळ अर्थ अतिरिक्त मतदानात भाजपला मिळणाऱ्या मतांचा वाटा हा ४०% आहे. २०१९ च्या विधानसभेच्या तुलनेत यावेळी जवळजवळ १ कोटी मतदान जास्त झाले आणि भाजपला ४४ लाख मते २०१९ च्या तुलनेत अतिरिक्त मिळाली. म्हणजेच २०१९ च्या तुलनेत झालेल्या अतिरिक्त मतदानात भाजपाला मिळणाऱ्या मतांचा वाटा हा ४५% आहे.

महिलांचे वाढीव मतदान

महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का हा २०१९ मध्ये ५९.२६ % होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान ६५.२१% पोहोचलला आहे. जवळ जवळ ५२ लाख मतांच्या उल्लेखनीय वाढीमुळे लाडकी बहीण योजना सर्व स्तरातील महिलांना कमालीची भावली आणी विरोधकांनी कितीही टोमणे मारले तरी महिना अतिरिक्त १५०० रूपांचे मोल या महिलांना नक्कीच माहित असल्याचे दिसून आले.

या सगळ्याचा अर्थ म्हणजे लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली आहे. अधिकाधिक महिला याचा लाभ घेत आहे. मतदान करण्यासाठी फारसा उत्सुक नसतो अशा मध्यमवर्गीय समाजाने हिंदुत्वासाठी बाहेर पडून मतदान केले. नवे, तरुण मतदार धर्मनिरपेक्षतेच्या मागे न लागता, शाश्वत आणि स्थिर विकासाच्या मुद्यावर पक्षाला सत्तास्थानावर बसवण्यासाठी मतदान करण्यास प्राधान्य देवू लागले आहे असे यावरून दिसून येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24