कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. यात माझा बळी गेला. अजित पवार यांनी रोहित पवार यांना तुझ्या मतदारसंघात सभेला आलो असतो तर काय झाले असते, हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर बोलताना भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.
.
राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवार जे स्वत:ला भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजतात, त्यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच राजकीय सारीपाठामध्ये जे घडले त्यांचा मी बळी ठरलो आहे.
महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळायला हवा होता
राम शिंदे म्हणाले की, या विषयावर मला माध्यमांसमोर बोलण्याची इच्छा नव्हती. पण अजित पवार या विषयावर बोलले त्यामुळे मला या विषयावर बोलल्याशिवाय पर्याय नाही. यावर पक्षश्रेष्ठीसोबत मी आधीच बोललो आहे. त्यांच्या कौटुंबिय कलहात जे अघोषित सामजस्य करार झाले ते कर्जत-जामखेडमध्ये जाणवत आहे. महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळायला हवा होता. माझ्यासारखा छोट्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यक्तीने बलाढ्य शक्तीच्याविरोधात मी लढा दिला. राज्यात कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये माझे नाव आहे. मला जवळपास 1 लाख 26 हजार मते मिळाली. माझ्याविरोधात अघोषित कारवाईच्या कटाचा मी बळी ठरलो आहे.
..हे चांगले नाही
राम शिंदे म्हणाले की, महायुतीमधील वरीष्ठनेत्यांकडे तक्रार करण्यापेक्षा जर त्यांच्यावरच असा प्रश्न उपस्थित होत असेल तर हे चांगले नाही.आमच्या वरीष्ठाने यांचा गांभीर्याने लक्ष घालायला हवे. फेरमतदान मोजणीसाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला. जिल्हाधिकार्यांकडे मी आज जाणार आहे.
अजित पवार-रोहित पवारांची प्रीतीसंगमावर भेट
विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड मधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की, ‘बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’ असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. वाचा सविस्तर