विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मंगळवारी महापालिकेतर्फे घरोघरी स्टिकर्स, संकल्प पत्र व फलकांद्वारे मतदार जागृती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्टसमोर ठेवण्यात आले. मात्र हे साध्य झाले
.
दरम्यान मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागातील घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीचे स्टीकर लावणे व मतदारांकडून संकल्प पत्र भरून घेणे तसेच संकल्प फलकांव्दारे मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. यासाठी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, आशा सेविका आणि मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ६५ पथक कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे कमी मतदान असलेल्या मतदान केंद्र निहाय भागांमध्ये मतदारांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
यापूर्वी भिंतीचित्रांद्वारे जनजागृती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील विविध भागात भिंतीचित्रांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कार्यालयाव्दारे शहरातील विविध भागात बैठका व रॅलीच्या सहाय्याने मतदान जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील नागरिकांकडून मतदानाचे संकल्प घेण्यात येत आहे.