बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे.ते या राज्याची नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितले, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्या प्रकारचा आरक्षण
.
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी, ते आयसीयूमध्ये आहेत, छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी आयसीयूमधून करू नये. ही खूप नाजूक शस्त्रक्रिया असते मी त्यातून दोन-तीन वेळा गेलोलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढचे सात आठ दिवस त्यांनी खूप कमी बोललो पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो. या प्रकरणांमध्ये त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो.
महाराष्ट्र स्वाभिमानी
संजय राऊत म्हणाले की, अनेक प्रकल्प गुजरातले पळवून नेले. महाराष्ट्राचे हक्काचे ओरबाडायचे आणि इथे येत महाराष्ट्राच्या तोंडावर काहीतरी फेकून जायचे, असे त्यांचे सुरू आहे. महाराष्ट्र भिकारी आहे काय, महाराष्ट्र त्यांच्या भिकेवर जगत नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाबातही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. अरविंद सावंत जबाबदार नेते आहेत. भाजपच्या उमेदवार मुंबईच्या नाहीत. त्या बाहेरून आयात केलेल्या आहेत. त्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी बाहेरून आलेला व्यक्ती, आयात केलेल्या उमेदवार असे म्हणाले, त्यात अयोग्य काय आहे, सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
देवाभाऊंना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का?
राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ची सुरक्षा स्वत:च वाढवली आहे. राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाही, याची महाराष्ट्राला चिंता वाटत आहे. त्यांना कुणापासून धोका आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून धोका आहे का? देवाभाऊंना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का?; कारण पुढील 15 दिवसात त्यांच्यातील मुख्यमंत्रीपदाची जंग वाढणार आहे. आंतिरेक्याशी लढणारी अख्खी फोर्स सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. त्यांनी कुणाला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही म्हणून धोका आहे?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राला देवाभाऊंच्या सुरक्षेबाबत संघ कार्यालयात बसून तरी माहिती द्यायला हवी. आमच्या नाशिकमधील उमेदवार हिरेंना सुरक्षा दिली जात नाही. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आमचीदेखील सुरक्षा काढण्यात आली. पण फडणवीसांची सुरक्षा का वाढवली, देशावर इतर देश हल्ला करणार आहे असे राऊतांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर