राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ची सुरक्षा स्वत:च वाढवली आहे. राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाही, याची महाराष्ट्राला चिंता वाटत आहे. त्यांना कुणापासून धोका आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून धोका आहे का? देवाभाऊंना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का?; कार
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राला देवाभाऊंच्या सुरक्षेबाबत संघ कार्यालयात बसून तरी माहिती द्यायला हवी. आमच्या नाशिकमधील उमेदवार हिरेंना सुरक्षा दिली जात नाही. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आमचीदेखील सुरक्षा काढण्यात आली. पण फडणवीसांची सुरक्षा का वाढवली, देशावर इतर देश हल्ला करणार आहे असे राऊतांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र लुटला जातोय
महाराष्ट्र लुटला जातोय, तोडला जातोय, बदनाम होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश होत आहे. त्यांचे ते स्वप्न आहे महाराष्ट्राची लूट व्हावी, महाराष्ट्र खतम व्हावा असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा ते आमच्या कामावर खूश होतात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची बेकायदेशीर नेमणूक घटनाबाह्य पद्धतीने मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी सुभेदार नेमला आहे.
मोदींचा सुभेदार महाराष्ट्र लुटतोय
संजय राऊत म्हणाले की, जुन्याकाळी हे सर्व सुभेदार आपल्या प्रांतामधील लुट दिल्लीत देत असत. तसेच काहीसे आताच्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या बाबतीत कायम ठेवण्यात आला आहे. त्यांनी महाराष्ट्रात नेमलेला सुभेदार महाराष्ट्र लुटत आहे. आधीपेक्षा जास्त माल दिल्लीला देत असल्याने मोदी खूश होत आहे.