पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात: शेवगावातून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज, प्रतिज्ञापत्रात घटस्फोटीत असल्याची माहिती – Ahmednagar News



काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या प्रशिक्षणार्थी आयएएक अधिकारी पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. पूजा खेडकरचे वडील लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून

.

दिलीप खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या तपशीलाच्या रकान्यात पाच वर्षांतील आयकर विवरण पत्रातील उत्पन्न लिहिले आहे. लोकसभेला पत्नी म्हणून केलेला उल्लेख विधानसभेला टाळण्यात आला आहे. पत्नीच्या रकान्यात ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. तसेच अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या रकान्यातही ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची पत्नी मनोरमा यांच्याविषयी माहिती दिली होती.

खेडकरांवर दाखल गुन्हे दिलीप खेडकर यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर विनयभंग, जीवे मारण्याची धमकी इत्यादी गुन्ह्यांची नोंद आहे. दिलीप खेडकर यांची पत्नी मनोरमा खेडकर विरोधात पुण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये दोघेही पती-पत्नी सहआरोपी आहेत. जून 2023 मध्ये जमिनीच्या वादातून पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दिलीप खेडकर यांची संपत्ती किती? दिलीप खेडकर प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 8.91 लाखांचे सोने असून त्यांच्या मालकीची 31 एकर जमीन आहे. पनवेल, भालगाव आणि अहिल्यानगरमध्ये दीड कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. तसेच त्यांनी 2022-23 मध्ये 43.59 लाखांचे उत्पन्न दाखवलेले आहे.

पूजा खेडकरवर कायमची बंदी पूजा खेडकर हिच्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत निवड सुनिश्चित करण्यासाठी फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप होता. केंद्र सरकारने 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या आदेशाद्वारे तिला IAS प्रोबेशन नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 जुलै रोजी तिची उमेदवारी रद्द केली आणि तिच्यावर कायमची बंदी घातली.

हे ही वाचा…

288 जागांसाठी तब्बल 7,995 उमेदवार मैदानात:प्रमुख नेत्यांची दिवाळी बंडखोरांची समजूत काढण्यात जाणार, जोरबैठका सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 995 उमेदवार मैदानात आहेत. त्यातच महायुती व महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे बड्या नेत्यांपुढे बंडखोरांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या नेत्यांचा दिवाळीचा संपूर्ण सण बंडखोरांसोबत जोरबैठका काढण्यातच जाणार असल्याचे चित्र आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24