वसंत देशमुख यांना शिक्षा व्हायला हवी, मुलींबद्दल असे बोलले जात असेल तर मुलींना राजकारणात का यावे असा सवाल बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.वसंत देशमुख फरार झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी माध्यम
.
दरम्यान जयश्री थोरात पुढे बोलताना म्हणाल्या की, सुजय विखेंकडून माझ्यावर पातळी सोडून टीका करण्यात आली असा आरोप जयश्री थोरातांनी केली आहे. मला जर रात्रभर पोलिस स्थानकांच्या बाहेर उभे रहावे लागेत असेल तर पोलिसांवर किती दबाव होता हे लक्षात घ्या, असे म्हणत त्यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र पोलिस ठाण्यासमोर बसून काढली. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संगमनेरमधील धांदरफळमध्ये माजी खासदार, भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर संगमनेर मतदारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर जयश्री थोरात यांनी या विधानाचा निषेध केला आहे. रात्रभर त्या पोलिस स्टेशनबाहेर बसून होत्या.
नेमके काय घडले?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. या सभेत अध्यक्षस्थानी असलेल्या वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गावातील संतप्त महिलांनी ही सभा उधळून लावली. यानंतर गोंधळ झाला. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक, जाळपोळ केली.
वसंतराव देशमुख यांनी याचबरोबर महिलांचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे. यामुळे सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. हे ऐकताच धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली. सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला. याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले. तसेच वसंतराव देशमुख यांनाही नियोजन करताना भाषण संपवण्यास सांगितले. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपवून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
विखेंच्या ताफ्यातील गाडी पेटवली, दगडफेक केली
सभा उधळल्यानंतर संतप्त लोकांनी एक गाडी फोडल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर विखे यांच्यासमवेत लोणीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या संगमनेर तालुक्यातील तरुणांनी अडवल्या. या वेळी संगमनेर तालुक्यातील युवक व राहाता तालुक्यातील व लोणी परिसरातील युवकांमध्ये बाचाबाची निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण झाले आहे. सभेत गोंधळ घातला म्हणून विखे समर्थक संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमले होते.