मुंबई2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

विजय वडेट्टीवार हे विद्वान गृहस्थ आहेत. पण जागावाटपात बदल होणार नाही. वडेट्टीवार आधी शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले. ते मेरिटवर बोलत आहेत. त्यांचे स्वागत आहे. मविआच्या काही जागा आपापसात बदलल्या जातील, असे ठाकरे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मविआतील मित्रपक्षाला टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, उमेदवारांची निवड करताना जिंकून येण्याची क्षमता हा निकष ग्राह्य धरला जातो. त्यामुळे उमदेवारांनी संयमाने बोललं पाहिजे. अनेक कार्यकर्ते 5 वर्षे काम करतात, पण स्पर्धेमुळे ते माग पडतात. सरकार आल्यावर त्याची भरपाई केली जाते. उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होणे किंवा टीका होणे स्वाभाविक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
कुणाच्या उमेदवारीबद्दल बोललो का?
संजय राऊत म्हणाले की, कोण काय आरोप करतंय, याकडे आम्ही लक्ष देत नाही. आता बेलापूरमध्ये संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि एका तासात त्यांना उमेदवारी मिळाली. सिंदखेड राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे 10 तासांपूर्वी आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली, असे म्हणत उमेदवारांच्या निवडीतील घोळावरुन ठाकरे गटावर सुरु असलेल्या मित्रपक्षांच्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये नीलेश लंके शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या पक्षात होते, शेवटच्या क्षणी ते राष्ट्रवादीत आले. मग या जागांबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केले का, या जागा विकल्या की आणखी काय झाले, याबाबत आम्ही प्रश्न विचारत नाही.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी बुधवारी सायंकाळी आपला 85-85-85 चा फॉर्म्युला जाहीर केला. पण गुरुवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपला पक्ष किमान 100 ते 105 जागा लढवेल असे ठासून सांगितले. तर आम्ही आकड्यावर नाही तर मेरिटवर जागा वाटप केल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी विविध अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.