आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने 99 जणांची यादी जाहीर केली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीची देखील यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद तसेच जागावाटपावरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच
.
भास्कर जाधव यांनी विदर्भातील 14 जागांवर हक्क असल्याचे म्हणले आहे. मात्र त्या जागा देण्यास कॉंग्रेस तयार नसल्याने महाविकास आघाडीमध्ये या जागांवरून तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. भास्कर जाधव म्हणाले, महाविकास आघाडी तुटावी अशी आमची इच्छा नाही, पण तुटेपर्यंत आणू नका, असा थेट इशाराच जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर जागांवरील तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात असून उमेदवारांची यादी देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये 260 जागांवर एकमत झाले आहे, मात्र 28 जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीमुळे कॉंग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा देण्याची चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र 12 जागांवर कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये आज देखील बैठक झाली असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता सोमवारी महाविकास आघाडीमधील जागावाटपावरील तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.