ठाकरे गटाचे 32 उमेदवार जवळपास निश्चित: संभाव्य उमेदवारांची यादी समोर, पैकी 2-3 जागांवर फेरविचार होण्याची शक्यता; पाहा यादी – Mumbai News



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे फायनल करून यादीवर शेवटचा हात फिरवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादीही पुढील 2-3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त

.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारपर्यंत जाहीर केली जाईल. तूर्त पक्षाच्या 32 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली असून, त्यापैकी 2-3 उमेदवारांच्या नावावर फेरविचार सुरू आहे. यावरही पुढील 2 दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.

खाली वाचा संभाव्य उमेदवारांची यादी

  • आदित्य ठाकरे – वरळी
  • वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
  • सुनील प्रभू – दिंडोशी
  • भास्कर जाधव – गुहागर
  • उदयसिंह राजपूत – कन्नड
  • राहुल पाटील – परभणी
  • अजय चौधरी – शिवडी
  • राजन साळवी – राजापूर
  • वैभव नाईक – कुडाळ
  • नितीन देशमुख- बाळापूर
  • सुनील राऊत – विक्रोळी
  • रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
  • प्रकाश फातर्फेकर – चेंबूर
  • कैलास पाटिल – धाराशिव
  • संजय पोतनीस – कलिना
  • ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
  • स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
  • सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
  • अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
  • नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
  • अनिल कदम – निफाड
  • दीपेश म्हात्रे -डोंबिवली
  • सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
  • मनोहर भोईर – उरण
  • किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
  • राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
  • दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
  • कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
  • सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
  • राजन तेली – सावंतवाडी
  • दीपक साळुंखे – सांगोला
  • विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर

उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व ठाकरे गटात ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांवर आज प्रामुख्याने चर्चा होईल. ठाकरे व शरद पवार गटातील जागावाटपाचा वाद संपला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24