संगमनेर भाजपला सुटणार: सीएम होण्याचे स्वप्न पाहणारे, आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, सुजय विखेंची बाळासाहेब थोरांतावर टीका – Ahmednagar News



मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे, यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, असे म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतावर टीका केली आहे. तर दहशत झुगारून परिवर्तनासाठी ठेकेदारी संस्कृतीविरोधात युवकांनी उभे राहावे, असे

.

सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षे तालुक्यात फक्त नातेवाईकांसाठी राजकारण केले असा आरोप त्यांनी केला आहे. तर वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हांडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात?असा सवाल विखेंनी संगमनेर मतदारसंघात युवा संकल्प मेळाव्यात उपस्थित केला.

सुजय विखे इच्छुक

काही दिवसांपूर्वी सुजय विखे म्हणाले की, मला संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल. इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधूनच उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे,

संगमनेरची जागा भाजपला सुटणार

सुजय विखे म्हणाले की, सुजय विखे यांना या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपच्या वाट्याला येईल, तळेगाव, निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परिवर्तन केले. तसेच आता येणाऱ्या निवडणुकीतही करायचे असे त्यांनी म्हटले आहे.

थोरांतांनी नातेवाईकांनाच पदे वाटली

सुजय विखे म्हणाले की,चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. यांनी केवळ नाते ठेकेदार आणि जमिनीचा ताबा मिळवणारे याच गोष्टीवर पद वाटप केले असा आरोप त्यांनी केला. तर मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

1985 पासून थोरातांचे वर्चस्व

संगमनेरवर बाळासाहेब थोरातांचे सतत वर्चस्व 185 पासून विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सतत वर्चस्व ठेवले आहे.सलग आठ वेळा ते विधानसभेत निवडून गेले. 1995 ला मात्र वसंतराव गुंजाळ व त्यांच्यात अटीतटीची लढत झाली. हा एक अपवाद वगळता दरवेळी थोरात यांचे मताधिक्य वाढलेलेच आहे. मंचरच्या शकुंतला थोरात, बापूसाहेब गुळवे, अरुण इथापे, दिलीप शिंदे, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर आदी उमेदवारांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. प्रभावी प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांचा संच वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारावर ठेवलेली मजबूत पकड याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मिळत गेला. सर्व सहकारी संस्थांवर थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24