चारित्र्यावर संशय घेत पत्नीची‎हत्या; पतीला एमपीतून अटक: बडनेरा रेल्वे स्थानकावरील हत्याकांडाचा उलगडा‎ – Amravati News



बडनेरा रेल्वेस्टेशन परिसरात घडलेल्या ‎‎महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा‎करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश ‎‎आले. पत्नीला नुकतीच ओळख‎झालेल्या परपुरुषासोबत बघितल्याने पतीने ‎‎संतापाच्या भरात तिची ओट्यावर डोके ‎‎आपटून हत्या केल्याचे तपासात समोर‎आले. त्

.

लक्ष्मण मानसिंग मरावी, (३४) रा. ‎‎ओहनी, मध्य प्रदेश असे आरोपी पतीचे‎तर भागवती लक्ष्मण मरावी (३८) असे‎मृताचे नाव आहे.‎ पोलिसांनी या प्रकरणात आधी शेखर‎उर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर (३४)‎रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बडनेरा याला‎अटक केली होती.

बडनेरा रेल्वे‎स्टेशनवरील जुन्या वस्तीच्या बाजूने‎तिकीट घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ‎१५ ऑक्टोबरला सकाळी एका महिलेचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मृतदेह आढळला होता. मृत महिलेच्या‎शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील‎जखमांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद‎असल्याने तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले‎होते. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी गुन्हा‎दाखल करून तपास आरंभला. गुन्हे‎शाखेचे युनिट दोन्ही या गुन्ह्याचा समांतर तपास करत‎होते. तपासात रेल्वे स्टेशनवर पाणी‎बॉटल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या‎एका व्यक्तीच्या बयानावरून शेखर‎चिंचोळकरला अटक करून त्याची‎चौकशी करण्यात आली. चौकशीत‎त्याने १४ ऑक्टोबरला घडलेल्या‎घटनेबाबत माहिती दिली. परंतु,‎त्यानंतरही मृत महिलेची ओळख न‎पटल्याने गुन्हे शाखेच्या युनिट दोनने‎त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.‎सीसीटीव्ही फुटेज, फोटो व अन्य‎माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या‎युनिट दोनला मृतक महिलेची‎ओळख पटवण्यात यश आले.‎

मृतक ही भागवती मरावी‎असल्याचे समोर आल्यावर १७‎ऑक्टोबरला रात्री तिचा पती‎लक्ष्मणला त्याच्या गावातून अटक‎केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची‎कबुली देत संपूर्ण घटनाक्रम‎सांगितला. लक्ष्मण मरावी हा पत्नी‎भागवतीसोबत कामाच्या शोधात‎अमरावतीत आला होता. ते दोघे‎बडनेरा परिसरात काम शोधत होते.‎१४ ऑक्टोबरला त्यांची बडनेरातील‎भगतसिंग चौकात शेखर चिंचोळकर‎या व्यक्तीसोबत भेट झाली. तुम्हा‎दोघांनाही काम मिळवून देतो, असे‎आश्वासन त्याने मरावी दाम्पत्याला‎दिले. त्याचवेळी शेखरने दोघांनाही‎स्वतःच्या घरी थांबण्याचा आग्रह‎धरला.

पण, लक्ष्मणने त्याला नकार‎देत आम्ही गावाला निघून जातो, असे‎म्हणत पत्नी भागवतीसह रेल्वे‎स्टेशनकडे निघाला. त्यावर मी‎तुम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून देतो,‎असे शेखरने म्हटले. त्यानंतर तिघेही‎रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यावेळी‎शेखरने लक्ष्मणच्या पत्नीकडून दारू‎आणण्यासाठी ५०० रुपये घेतले व तो‎तेथून निघून गेला. त्यानंतर लक्ष्मणने‎गावी जाण्यासाठी गोंदियापर्यंतचे दोन‎तिकीट काढले. काही वेळाने शेखर‎दारू घेऊन आल्यावर तिघांनीही‎वाहन तळानजीक पाण्याच्या‎टाकीखाली मद्यप्राशन केले. ही‎कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे‎पीआय बाबाराव अवचार यांच्या‎नेतृत्वात सपोनि महेश इंगोले,‎पीएसआय संजय वानखडे, दीपक‎सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक‎देशमुख, चेतन कराडे, संदीप खंडारे‎यांनी केली.‎

पत्नी आक्षेपार्ह स्थितीत‎दिसल्यावर विटेने ठेचले‎

लक्ष्मणला दारू चढल्याने तो तेथेच झोपी‎गेला. दरम्यान, काही वेळाने जाग‎आल्यावर लक्ष्मणला पत्नी भागवती‎आणि शेखर आक्षेपार्ह स्थितीत दिसले.‎लक्ष्मण शिव्या देत उठल्यावर शेखर‎तेथून पळून गेला. त्यानंतर लक्ष्मणने‎रागाच्या भरात पत्नी भागवतीचे डोके‎ओट्यावर आपटले. तसेच विटेने तिच्या‎डोक्यावर वार केले. त्यानंतर लक्ष्मण‎पुन्हा झोपी गेला. १५ ऑक्टोबरला पहाटे‎उठल्यानंतर त्याला पत्नी भागवती‎मृतावस्थेत दिसली. त्यामुळे तो गावी‎पळून गेला, असे तपासात समोर आले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24