भाजप उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही, क्षमतेवरच उमेदवार ठरतो: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा


मुंबई3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे. त्यामुळेच हे डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचे काम करत असल्याचे ते म्हटले.

महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर ते केंद्र सरकारची मदत घेणार नाहीत. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असले तरी देखील ते मदत घेणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्राचे नुकसान करतील. त्यामुळे युतीचेच सरकार चांगले काम करणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. काल देखील त्यांनी बावनकुळे यांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती. यावर इच्छुक उमेदवारांना भेटणे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही

भारतीय जनता पक्ष कोणत्याही पद्धतीने उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही. उमेदवार हा त्याच्या क्षमतेवर ठरत असतो. मतदारसंघातील जनतेचे मत काय आहे? तेथील कार्यकर्त्यांचे मत काय आहे? यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे समाज म्हणून कोणताही निर्णय करण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वावर निर्णय केला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेतो. त्यामुळे त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दोन उमेदवारी इच्छुक असतील तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत

एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवारी इच्छुक असतील आणि दोघांनी उमेदवारी मागितली, तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही कोणी विधानसभा निवडणूक लढवत असेल, तरच त्याला बंडखोरी म्हटले जाते. त्यामुळे एका मतदारसंघात जास्त इच्छुक असणे, ही बंडखोरी होत नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणाचीही समजूत काढण्याची आवश्यकता नाही. पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेत असतात. असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आज दिल्लीत बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीची शक्यता देखील आज वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….

निवडणुकीनंतर आघाडीतील नेते एकत्र राहतील याची खात्री नाही:शिंदे गटाच्या नेत्याचे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नेते एकत्र राहतील असे मला वाटत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडला आहे या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे केवळ निवडणुकीच्या स्वार्थासाठी हे नेते एकत्र आले असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई:या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला मिर्झापूरमधून अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी

​​​​​​​मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथून यादव याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24