भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर व तालुका आणि नालंदा स्तूप बुद्धिजम ॲण्ड रिसर्च ट्रस्टच्या वतीने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नियोजित बुद्धविहार स्थळावर डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून बाईक रॅली काढण्यात
.
प्रारंभी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन समता सैनिक दलाच्या जवानांनी पहिली मानवंदना दिली. परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमला. महिलांनी बुद्धवंदना सादर केली. यानंतर उपस्थित मान्यवर राजश्री कदम, संदेश काकडे, अनिल खुने आणि सत्यजित जानराव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्माचे अधिष्ठान व सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
रॅली नियोजित बुध्दविहार स्थळावर आल्यानंतर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करून विशेष बुद्धवंदना सादर करण्यात आली. बौद्ध महासभा बार्शी तालुका अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व व डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा सांगितली. उपाध्यक्ष शंकर जाधव व चंद्रकला जाधव यांच्या कुटुंबियांनी उपस्थितांना गोड खीर प्रसाद म्हणून दिला. शहर अध्यक्ष रमेश पालके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर सुत्रसंचालन सचिव विश्वास वाघमारे यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाच्या जवानांची परेड प्रवीण आखाडे यांनी घेतली. या कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.