एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांचा सामना काँग्रेसचे येथील उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अद्याप येथून उमेदवार
.
इम्तियाज जलील म्हणाले, मला नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळत आहे. तसेच लोकांमध्ये देखील रोष पाहायला मिळत आहे. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो, मला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली, हे तर सर्वांना माहीतच आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. भाजपची ‘बी’ टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचेही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देत कॉंग्रेसने चांगलीच खेळी खेळली असल्याचे दिसत आहे. मात्र याला विरोध म्हणून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील देखील तयार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेडची लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.
कॉंग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून खासदार म्हणून निवडणून आले. मात्र खासदार वसंतराव चव्हाण यांचे अवघ्या तीन महिन्यातच निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक लढवली जाणार आहे.