“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका



Manoj Jarange Patil Reaction After BJP Radhakrishna Vikhe Patil Met: आता मैदान वेगळे आहे, ते जिंकायचे की पाडायचे ठरेल. नारायणगडाची सभा झाल्यापासून इच्छुक उमेदवार वाढल्याचे वाढत आहे. जेव्हा ठरेल जो कोणत्याही पक्षाचा असेल तो आमच्या विचाराचा असेल तर मराठे त्याच्यामागे त्याच्या मागे उभे राहणार आहेत. ‘माझे ऐक नाहीतर खतम करू’ अशी सूडबुद्धीची रचना सुरू आहे. त्यांचा शेवट राजकीय अंतात असेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. ज्यावेळी पाडायचे की लढायचे हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आता फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी ही चर्चा गरजेची आहे. २० तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय

मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या भेटीबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आता चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचे, निर्णय घेता येत नाही. ज्यावेळी करायचे होते तेव्हा केले नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच (देवेंद्र फडणवीस) भरकटला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

दरम्यान, आम्हाला  शेतकरी, मुस्लीम, गोरगरिब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे. सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे.

 

Web Title: maharashtra assembly election 2024 manoj jarange patil reaction after radhakrishna vikhe patil meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24