राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे माढा विधानसभेसाठी मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी तिकीटाची मागणी केली आहे. ते विचार करतो म्हणाले आहे.तुतारीचे तिकीट मिळाले तर ठीक नाही, अन्यथा १९९५ प्रमाणे छत्री चिन्हेवर मुलाला अपक्ष म्हणून निवडणूकीच्या मैद
.
माढा तालुक्यातील चव्हाणवाडी गावातील एका कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडली. आमदार शिंदे पुढे म्हणाले, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करुन तुमच्याकडुन उभा राहण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितले आहे. ३८ वर्षे मी पवारासोबत काम केले आहे. पवार साहेब उमेदवारीचा विचार करतो म्हटले आहेत. तुतारीचे तिकीट नाही मिळाले तर १९९५ सालच्या निवडणुकीसारखी छत्री चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात मुलाला उतरवण्याचा निर्णय कार्यकर्त्याच्या बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपूर्वीच पंढरपुर भागातील शेगाव दुमाला येथे” महायुतीचा विषय आता संपलाय” तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.त्यातच पुन्हा एकदा आमदार शिंदेनी तुतारी किंवा अपक्षचा नारा दिला आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे हे महायुतीतुन लढणार नाहीत.हे जवळपास निश्चित झालेले आहे. दरम्यान सोलापूर जिल्हात अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसणार आहे.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली. भेटीनंतर दोघांनी एकाच गाडीतुन प्रवास केला.गाडीतील पवार व शिंदे यांचा एकत्रित बसलेला फोटो पाहून मात्र तुतारी घेऊन माढ्यातून लढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झालेला दिसून येत आहे.