शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे इस्लामपूर येथे आली आहे. यावेळी सभेपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी झालेला पाहायला मिळाला नाही. यावे
.
शरद पवार म्हणाले, सत्तेत असलेल्यांनी जे करायला हवे होते ते केले नाही, त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रात बहीणींसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना आणली जाते. पण स्त्रियांसाठी 50 टक्के आरक्षण आम्ही दिले आहे. त्यामुळे स्त्री सरपंचपदापासून अनेक पदावर महिला पोहोचल्या आहेत, असे शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली? असा टोला देखील शरद पवारांनी महायुती सरकारला लगावला आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले होते. तसा महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तसाच महाराष्ट्र आम्हाला बघायचा आहे. महाराष्ट्र पुन्हा नव्याने घडवायचा आहे. पुढे जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या उमेदवारीची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यावी. त्यांना आता महाराष्ट्रात दौरे करायचे आहेत. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ आता जनतेने सांभाळावा, असे आवाहन शरद पवारांनी इस्लामपूर मतदारसंघातील जनतेला केले आहे.
या सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटीलच भावी मुख्यमंत्री होणार, असा दावा केला आहे. अमोल कोल्हे म्हणाले, वाळव्याचा माणूस वर्षावर जावा पण पावसाच्या रुपाने वर्षाच वाळव्यात आली. नियतीच्या मनात आहे. त्यामुळे तुम्हाला ताकद लावावी लागेल असे अमोल कोल्हे जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले. यावेळी व्यासपीठावर पक्षाध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.