शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा इस्लामपूर येथे दाखल झाली आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी सांगता सभा पार पडणार आहे तसेच महाराष्ट्राच्या निवडणुक
.
जोरदार पावसाला सुरुवात होताच जमलेल्या कार्यकर्ते व समर्थकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या व जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. पाऊस थांबल्यावर जयंत पाटील पुन्हा व्यासपीठावर आले. भर पावसातही कार्यकर्त्यांनी आपली जागा सोडली नसल्याचे दृश्य यावेळी बघायला मिळाले. या सभेला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजच्या या सभेकडे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय पराराज्यात जाणे, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी लोकांसमोर मांडण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची 9 ऑगस्टपासून सुरू झाली असून 24 दिवसात 19 जिल्ह्यांचा दौरा करण्यात आला आहे. यासाठी जवळपास 7365 किमीचा प्रवास केला गेला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे ज्या ठिकाणी बलस्थाने आहेत अशा सर्व मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा पोहोचवत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.